चक्रीवादळ(दितवाह) तामिळनाडूच्या जवळ; महाराष्ट्रात थंडीत वाढ, पारा १०°C पर्यंत घसरणार
चक्रीवादळ(दितवाह) तामिळनाडूच्या जवळ; महाराष्ट्रात थंडीत वाढ, पारा १०°C पर्यंत घसरणार
Read More
कांदा बाजारात घसरणीचे सत्र सुरूच: आवकेच्या दबावाने नाशिकमध्येही दर कोसळले, शेतकरी हवालदिल!
कांदा बाजारात घसरणीचे सत्र सुरूच: आवकेच्या दबावाने नाशिकमध्येही दर कोसळले, शेतकरी हवालदिल!
Read More
कापूस बाजारात ८००० चा टप्पा कायम! अकोला, जालन्यात तेजी, पण इतरत्र दर स्थिर!
कापूस बाजारात ८००० चा टप्पा कायम! अकोला, जालन्यात तेजी, पण इतरत्र दर स्थिर!
Read More
सोयाबीन बाजारात ‘बिजवाई’ची चर्चा, पण जळकोट-मुखेडच्या दरांनी दिला खरा आधार!
सोयाबीन बाजारात ‘बिजवाई’ची चर्चा, पण जळकोट-मुखेडच्या दरांनी दिला खरा आधार!
Read More
फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये
फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये
Read More

हरभरा उत्पादन वाढीसाठी पेरणीनंतर व्यवस्थापनाच्या सोप्या टिप्स; दाण्याचा आकार वाढवण्यासाठी डॉ. कुटे यांचा सल्ला

कमी पाण्यात येणाऱ्या हरभरा पिकासाठी पाण्याचे नियोजन, आंतरमशागत आणि कीड नियंत्रणाचे प्रभावी उपाय

हरभरा हे रब्बीमधील महत्त्वाचे पीक असून ते कमी पाण्यात आणि कमी खत मात्रेमध्ये चांगले येते. परंतु हरभरा लागवडीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन, आंतरमशागत आणि रोग किडींवर प्रतिबंधात्मक उपाय केल्यास शेतकऱ्यांना हरभरा पिकाच्या एकरी उत्पादनात भरघोस वाढ मिळू शकते, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार कुटे यांनी दिला आहे.

पिकाच्या गरजेनुसार खत व्यवस्थापन

हरभरा हे कडधान्यवर्गीय पीक असल्याने त्याच्या मुळावरील गाठीद्वारे नत्राचे स्थिरीकरण करण्यात येते. त्यामुळे पेरणी करताना शिफारशीत मात्रेत (उदा. ४० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ५० किलो डीएपी) खत दिले असल्यास, पेरणीनंतर पिकाला खत देण्याची गरज पडत नाही. मात्र, ज्या भागात पाण्याची उपलब्धता कमी आहे, तेथे पीक फुलोरा अवस्थेत असताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) घेऊन फवारणी करावी. त्यानंतर, घाटे भरत असताना २ टक्के पोटॅशिअम नायट्रेट (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) याची दुसरी फवारणी करावी. या दोन फवारण्यांमुळे पीक उत्पादनात आणि दाण्याच्या आकारात वाढ पहायला मिळते.

आंतरमशागत आणि तण नियंत्रण

हरभरा पीक तणविरहीत राहण्यासाठी पेरणीनंतर आंतरमशागत करणे महत्त्वाचे आहे. पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली कोळपणी करावी, तर दुसरी कोळपणी त्यानंतर १५ ते २० दिवसांनी करावी. प्रभावी तण नियंत्रणासाठी, हरभऱ्याच्या पेरणीनंतर लगेच २४ तासाच्या आत स्टॉम्प या तणानाशकाची ५०० लिटर पाण्यात २.५ लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी उगवणीपूर्वी करणे आणि त्यावेळी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. यामुळे पिकांच्या वाढीला हानी न पोहोचवता तण नियंत्रण साधता येते.

नैसर्गिक आणि रासायनिक कीड नियंत्रण

हरभरा पिकावर घाटे अळी (Pod Borer) चे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कमी खर्चातील नैसर्गिक उपाय म्हणून एकरी किमान ५ कामगंध सापळे (Pheromone Traps) आणि ३० ते ४० पक्षीथांबे शेतात लावावेत. पीक फुलोऱ्यात येत असताना किडींचा बंदोबस्त करण्यासाठी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तसेच, घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल. इ. विषाणूची (१ मि.लि. प्रती लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करणे प्रभावी ठरते.

Leave a Comment