चक्रीवादळ(दितवाह) तामिळनाडूच्या जवळ; महाराष्ट्रात थंडीत वाढ, पारा १०°C पर्यंत घसरणार
चक्रीवादळ(दितवाह) तामिळनाडूच्या जवळ; महाराष्ट्रात थंडीत वाढ, पारा १०°C पर्यंत घसरणार
Read More
कांदा बाजारात घसरणीचे सत्र सुरूच: आवकेच्या दबावाने नाशिकमध्येही दर कोसळले, शेतकरी हवालदिल!
कांदा बाजारात घसरणीचे सत्र सुरूच: आवकेच्या दबावाने नाशिकमध्येही दर कोसळले, शेतकरी हवालदिल!
Read More
कापूस बाजारात ८००० चा टप्पा कायम! अकोला, जालन्यात तेजी, पण इतरत्र दर स्थिर!
कापूस बाजारात ८००० चा टप्पा कायम! अकोला, जालन्यात तेजी, पण इतरत्र दर स्थिर!
Read More
सोयाबीन बाजारात ‘बिजवाई’ची चर्चा, पण जळकोट-मुखेडच्या दरांनी दिला खरा आधार!
सोयाबीन बाजारात ‘बिजवाई’ची चर्चा, पण जळकोट-मुखेडच्या दरांनी दिला खरा आधार!
Read More
फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये
फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये
Read More

फळपीक विम्याचे ८६० कोटी रुपये वितरित; आंबिया बहारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार उर्वरित रक्कम

हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ अंतर्गत वितरण सुरू; सर्वाधिक भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीकडून.

हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ मधील आंबिया बहारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई वाटपाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८६० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहेत. हवामानातील विविध धोक्यांमुळे फळपिकांना मोठा फटका बसत असतो, ज्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना राबविण्यात येते. या वितरणासोबतच, उरलेली भरपाई रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली होती. आंबिया बहारमध्ये आंबा, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, द्राक्ष, मोसंबी, पपई आणि स्ट्राॅबेरी या प्रमुख फळपिकांसाठी ही योजना लागू होती. या आंबिया बहारासाठी शेतकऱ्यांनी एकूण २ लाख ३९ हजार अर्ज भरले होते. पडताळणीमध्ये २७ हजार ८२२ अर्ज बोगस आढळले, तर २ लाख ११ हजार अर्ज भरपाईसाठी पात्र ठरले. या पात्र अर्जापोटीच ८६० कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत.

या विमा योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनी (AIC), बजाज अलियान्ज, युनिवर्सल सोम्पो, आणि फ्यूचर जनरली या कंपन्यांनी आंबिया बहारासाठी योजना राबविण्याचे काम केले. शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या एकूण भरपाईत भारतीय कृषी विमा कंपनीने सर्वाधिक रक्कम वितरित केली आहे, जी ७४९ कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त, बजाज एलियान्ज कंपनीने ९० कोटी ८६ लाख रुपये, तर युनिवर्सल सोम्पो कंपनीने २० कोटी ५० लाख रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.

Leave a Comment